कृष्णार्पण



कृष्ण कृष्ण रे सावळा

निळे निळे श्याम रुप

मुकुटात मोरपीस

सांगी आत्म्याचे स्वरूप

 

कृष्ण कृष्ण रे रंगारी

उधळितो भावरंग

होई दुःखाचा विसर

देह भक्तीत गं दंग


कृष्ण कृष्ण रे मुरारी

फुंकी अवीट बासरी

सूर चंद्रात नहाती

विरे मोह षट् अरि


कृष्ण कृष्ण रे सांगाती

सखा श्वासांचा सोबती

कळी उमले प्राणाची

ब्रम्हांडाची अनुभूती


लिना यादव

टिप्पण्या