घोरकष्टोद्धारण श्लोक तिसरा
।।श्री गुरुदेव दत्त ।।
।।घोरकष्टोद्धारण दत्तप्रितीकारक स्तोत्र ।।
~ श्लोक तिसरा
पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं ।
भीतिं क्लेशं त्वं हराsशुत्वदन्यम् ।।
त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते ।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।।३।।
अर्थ - हे ईश्वरा, तू आमचे पाप,ताप ,शारिरीक तथा मानसिक व्याधी ,भिती, क्लेश यांना तुझ्या कृपादृष्टीने सत्वर दूर कर. तुझ्यासारखा दुसरा कोणीही तारणकर्ता मला दिसत नाही. तू माझा या घोर संकटातून उद्धार कर.तुला माझा मनःपूर्वक नमस्कार असो.
भावार्थ -
आज भावार्थ लिहिण्याआधी या श्लोकाचं पुन्हा पुन्हा पठण करताना,काही वर्षांपूर्वी वाचलेल्या The Gospel of Sri Ramkrishna या ग्रंथातील काही पद्य ओळींची आठवण झाली.. मला त्या ओळी या श्लोकातील भावार्थाशी फार चपखल जुळणा-या वाटल्या. मग संग्रहीत पुस्तक काढून त्या ओळी शोधून इथे घेतल्या आहेत...स्वामी श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या मूळ बंगाली पद्य ओळींचा इंग्रजी अनुवाद या पुस्तकात अनेक ठिकाणी दिला आहे... इंग्रजी ओळी अशा आहेत..
The Master sang :
Mother! Mother! My boat is sinking,here in the ocean of this world;
Fiercely the hurricane of delusion rages on every side!
Clumsy is my helmsman,the mind; stubborn my six oarsmen,the passions;
Into a pitiless wind
I sailed my boat and now it's sinking!
Split is the rudder of devotion; tattered is the sail of faith.
Into my boat the waters are pouring! Tell me what shall I do ?
For with my failing eyes,alas! Nothing but darkness do I see.
Here in the waves I will swim,
O Mother and cling to the raft of Thy name!
स्वामी रामकृष्ण परमहंसही आईकडे किती काकुळतीने समस्त जगताची व्यथा मांडतायत.तुझ्याशिवाय आमचा कोणीही रखवाला नाही हाच त्यांचाही भाव आहे.
स्वामीमहाराजांचेही हृदय भक्तांचे दुःख पाहून असेच गहिवरून आले असेल.त्या तळमळीतूनच, त्यांच्या तीव्र तपाचरणामुळेच इतक्या आर्त रचनेची प्रेरणा त्यांना झाली.अशीच असेल ना भक्तासाठी मांडलेली तळमळ...
हे दत्तात्रेया ईश्वरा,या जन्मी आणि अनेक जन्माजन्मातून माझ्या हातून घडलेल्या अनेक पापकर्मांचा तू -हास कर.कायिक, वाचिक, मानसिक अशी अनेक पापकर्मे नकळतपणे माझ्याकडून घडली असतील.ज्यांचे मला स्मरणही नाही.अशा अनंत कर्मांना तू नष्ट कर.तुझ्या कृपादृष्टीनेच ते शक्य आहे..अनेक दृश्य तसेच अज्ञात पितृदोष किंवा अदृश्य वाईट शक्तींकडून होणारे सर्व ताप शारीरिक तसेच मानसिक आधीव्याधी यांपासून माझी मुक्तता कर..माझे रक्षण कर..
अनेक किचकट तापप्रसंग माझ्या समोर उभे राहतात तेव्हा मला स्मरतही नाही माझ्या कुठल्या अशा कर्मांचे हे फलीत आहे.माझी मनस्थिती वादळी समुद्रात एकाकी अडकलेल्या एखाद्या नौकेसारखी होउन जाते..माझा आत्मविश्वास,माझी श्रद्धा डळमळीत होते..या वादळाला थांबविण्यासाठी कुठलाही मार्ग मला दिसत नाही आणि विक्राळ उसळणा-या लाटांवर भरकटत असलेल्या दिशाहीन नौकेसारखी माझी अवस्था होते..
हे ईश्वरा, तूच अस्तजूर्ती आहेस.( जूर्ती म्हणजे पीडा) माझ्यामागे लागलेल्या प्रत्येक पीडेचा अस्त करणे तुलाच शक्य आहे..या शरीरात वास करत असणाऱ्या प्रत्येक विकाररूपी शत्रूंचा आणि त्यातून उद्भवणाऱ्या प्रत्येक कर्मांचा समूळ उच्छेद करणे तुलाच शक्य आहे.तुझ्याशिवाय माझा आता कोणीही त्राता नाही.. तूच भयनाशन करणारा आहेस.या घोर संकटातून तूच माझी मुक्तता करू शकतोस..हे कृपाळू दत्तात्रेया, तुला माझा मनःपूर्वक नमस्कार.!!
।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। कृष्णार्पणमस्तु ।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा