प्रेमाचा मोरपिशी दिवस......
प्रेम म्हटलं की कृष्ण आठवतोच आणि कृष्ण म्हटलं की मोरपीस... ! आणि प्रेमाचे क्षण मोरपिशीच असतात ना म्हणून म्हटलं प्रेमाचा मोरपिशी दिवस...!आज प्रेमदिनी प्रेमाची अनेक रूपं न्याहाळताना प्रथम मनात अवतरला तो कृष्णरंग...मोहक निळाई...ही निळाई मोहमयी काव्य घडवते देहात आणि डोळ्यात मोर नाचतात..अनंत डोळे फुटतात त्या मोरपंखांना...त्यांना दिसतं ते फक्त प्रेमच.. प्रेम जडलं की अंतर्बाह्य स्वरूपच बदलून जातं त्या त्या जीवाचं.माणसाचंच असं नाही .निसर्गातली किती एक वैभवी अस्तित्वं ही फक्त ह्या प्रेममयी निरागसतेनं स्वतःला समर्पित करतात या अनंत अवकाशात..शिशिराच्या बोचऱ्या थंडीत होणारी झाडांची पानगळ, मायेने या वसुंधरेवर उबेचं पांघरूण घालत असते.तिच्या कायेला जपण्यासाठी आपला देह झाडून तिच्या देहावर देह अंथरतात ही झाडं....!एखाद्या स्वयंभू शिवलिंगावर अनंत काळ अभिषेक करणारा जलस्रोत पाहिलाय ना तुम्ही.कुठल्या मायेचं हे जग.ना कुठली वाच्यता ना कुठला युगायुगांचा शीण.सतत देहसमर्पण.अविरत वाहती अमर्याद प्रितीची नित्य अर्घ्ये.. जगणं सुंदर करणारी विलक्षण विलक्षण अद्भुत किमया म्हणजे प्रेम....! गर्भात बीज रुजलं की हळुवार पोटाव...