पोस्ट्स

धुआँ ही धुआँ

 #repost ना भेजा कोई खत ना चिठ्ठी कोई ये कौनसी धून है तुम्हारी मुझपे छाई हुई ना सो सकूँ सुकून से ,मैं करवट बदलती रही तेरी आहट जो आके सताती रही हथेलियों को मेरे जबसे चूमा है तुमने ये इत्तर की तरहा मेहकने लगी ये कौनसा रंग मुझपे उडाया है तुमने मैं तितलीयों के पंखो सी लगने लगी तेरी बाहों के घेरे में लिपटी थी जबसे मैं शक्कर के जैसी पिघलती रही ये तेरा इष्क है या सावन का पानी मैं फुलो की तरहा बहेकती रही ये लबों की लबों से जो बात गहरी हुई तेरी नशा की मैं जैसे दिवानी हुई ये आँखों के शोलो से जो किया तुने घायल मैं धुआँ ही धुआँ होके सुलगती रही मैं धुआँ ही धुआँ  होके सुलगती रही... लिना यादव ०७.०७.२०२०

प्रेमाचा मोरपिशी दिवस......

प्रेम म्हटलं की कृष्ण आठवतोच आणि कृष्ण म्हटलं की मोरपीस... ! आणि प्रेमाचे क्षण मोरपिशीच असतात ना म्हणून म्हटलं प्रेमाचा मोरपिशी दिवस...!आज प्रेमदिनी प्रेमाची अनेक रूपं न्याहाळताना प्रथम मनात अवतरला तो कृष्णरंग...मोहक निळाई...ही निळाई मोहमयी काव्य घडवते देहात आणि डोळ्यात मोर नाचतात..अनंत डोळे फुटतात त्या मोरपंखांना...त्यांना दिसतं ते फक्त प्रेमच.. प्रेम जडलं की अंतर्बाह्य स्वरूपच बदलून जातं त्या त्या जीवाचं.माणसाचंच असं नाही .निसर्गातली किती एक वैभवी अस्तित्वं ही फक्त ह्या प्रेममयी निरागसतेनं स्वतःला समर्पित करतात या अनंत अवकाशात..शिशिराच्या बोचऱ्या थंडीत होणारी झाडांची पानगळ, मायेने या वसुंधरेवर उबेचं पांघरूण घालत असते.तिच्या कायेला जपण्यासाठी आपला देह झाडून तिच्या देहावर देह अंथरतात ही झाडं....!एखाद्या स्वयंभू शिवलिंगावर अनंत काळ अभिषेक करणारा जलस्रोत पाहिलाय ना तुम्ही.कुठल्या मायेचं हे जग.ना कुठली वाच्यता ना कुठला युगायुगांचा शीण.सतत देहसमर्पण.अविरत वाहती अमर्याद प्रितीची नित्य अर्घ्ये.. जगणं सुंदर करणारी विलक्षण विलक्षण अद्भुत किमया म्हणजे प्रेम....! गर्भात बीज रुजलं की हळुवार पोटाव

मौनपक्षांची किलबिल....

 मौनपक्षांची किलबिल.... ती आहे आहे ,नाही नाही हे नक्की कळत नसताना मी काही काही लिहिलं होतं....कधी अर्धी ओळ,कधी पूर्ण कधी अपूर्ण. पण ती सारखी साद घालायची..धूसर धूसर उमटायची ..माझ्यातली कविता...! खूप खूप लिहायचं असायचं पण ते सगळं ब-याचदा डायरीतल्या तुरळक नोंदींपुरतच उमटलं, काहीसं विरून गेलं.आता आता मी फार लक्ष ठेवून असते माझ्या जाणिवांवर....मनातल्या उलथापालथींवर..... मन वेल्हाळ वेल्हाळ, मन चिंब ओले ओले मन स्वरूपाच्या रंगी ,आत्मरंगात नहाले........ माझ्याच एका खूप जुन्या कवितेच्या ओळी आहेत.काय काय लिहिले आहे मीच.....काल या अनेक लहान लहान ओळींची उजळणी करता करता आठवलं...आणि हे ही जाणवलं की खूप वाटतय पण मी लिहितेय हे माझं मलाच आधी कळलं नाही.....समोरच्या को-या अवकाशात अनेकदा नजरेनेच अक्षरं लिहिली जायची..ती तिथेच धुक्यासारखी विरघळूनही जायची...  पण आतल्या  जाणिवा जागृत व्हायला तिचं पूर्ण दर्शन होणं गरजेचं होतं आणि हे घडलं अगदी आता आता..अचानक भुईला पाझर फुटावा तशी जाणीव प्रवाही झाली...लेखणी बोलकी झाली....तसंही मला लिहून बोलणे अधिक आवडते.... ~ धुके सांडलेले मनाच्या तळाशी निळे मौनपक्षी तिथे नांदती

हृदयसंवाद....

  नदीच्या आतूर प्रवाहाला प्रीतीसंगमाच्या घाटावर विराट सागरी लाटेने घट्ट कवेत घ्यावे  हे तसेच काहीसे ..स्पंदनांच्या अनेक अदृश्य लहरींचे दृश्य रूप साकार होते आणि शब्दांशी मुक्त खेळ करते..प्रकटीकरणाचे सुख निराळेच असते..त्याला ना कशाची पर्वा ना कुठल्या सीमा.मन-स्पंदनांतून निर्माण होणाऱ्या अनंत लाटा तिचा डोह, त्या डोहाच्या खोलीचा ना थांग ना पत्ता.त्या लाटांना फक्त ओढ असते मुक्त मुशाफिरीची, अनंत अवकाशात स्वतःला झोकून देण्याची.....! त्या विशाल सागराची जेव्हा पहिली प्रितीभेट झाली, ती अनुभूती पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी धडपडणारी 'इच्छा' पुन्हा त्या नदीसारखी कपारीतून नवीन जन्मायला तयार असते..पुन्हा हवा असतो तो प्रवास काट्याकुट्यातून, दगडगोटयातून, कडेकपारे ,उंच सखोल प्रदेशातून लांघत येणारा 'भेटीसाठी'.... हे असंच काहीसं आतल्या स्पंदांचं....! त्या एका  सागरमिठीने आयुष्याच्या वाटा मोरपंखी केल्या....सावळ्या देहाला निळा स्पर्श झाला आणि निळीसावळी माया ओथंबून आली..निर्मळतेच्या रंगाशी निळी सगुणमिठी, नक्षत्रदेशीचा प्रियकर आणि ब्रम्हांडाचा रथ...संवादांची स्वरपौर्णिमा तिथेच उमलते..तिथेच व्या

घोरकष्टोद्धारण श्लोक तिसरा

 ।।श्री गुरुदेव दत्त ।। ।।घोरकष्टोद्धारण दत्तप्रितीकारक स्तोत्र ।। ~ श्लोक तिसरा  पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं । भीतिं क्लेशं त्वं हराsशुत्वदन्यम् ।। त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।।३।। अर्थ - हे ईश्वरा, तू आमचे पाप,ताप ,शारिरीक तथा मानसिक व्याधी ,भिती, क्लेश यांना तुझ्या कृपादृष्टीने सत्वर दूर कर. तुझ्यासारखा दुसरा कोणीही तारणकर्ता मला दिसत नाही. तू माझा या घोर संकटातून उद्धार कर.तुला माझा मनःपूर्वक नमस्कार असो. भावार्थ - आज भावार्थ लिहिण्याआधी या श्लोकाचं पुन्हा पुन्हा पठण करताना,काही वर्षांपूर्वी वाचलेल्या The Gospel of Sri Ramkrishna या ग्रंथातील काही पद्य ओळींची आठवण झाली.. मला त्या ओळी या श्लोकातील भावार्थाशी फार चपखल जुळणा-या वाटल्या. मग संग्रहीत पुस्तक काढून त्या ओळी शोधून इथे घेतल्या आहेत...स्वामी श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या मूळ बंगाली पद्य ओळींचा इंग्रजी अनुवाद या पुस्तकात अनेक ठिकाणी दिला आहे... इंग्रजी ओळी अशा आहेत.. The Master sang :  Mother! Mother! My boat is sinking,here in the ocean of this world; Fiercely the hurricane of delusion r

घोरकष्टोद्धारण श्लोक चौथा

 ।। श्री गुरुदेव दत्त ।। ।।घोरकष्टोद्धारण दत्तप्रितीकारक स्तोत्र ।। ~ श्लोक चौथा  नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वत्तो देव त्वं शरण्योsकहर्ता ।। कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।।४।। अर्थ - हे देवा, तुझ्याहून दुसरा कोणी त्राता नाही. तुझ्यासारखा कोणी दाता आणि  पाठीराखाही नाही.तूच दुःखहर्ता आहेस.हे अत्रेया, तुझा अनुग्रह होताच सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात.तू माझ्या वरही अनुग्रह कर..तूच या घोर संकटातून माझा उद्धार कर.तुला माझा नमस्कार असो. भावार्थ -  श्लोक म्हटल्यावर क्षणभर थांबून विचार केला..की आधीच्या ओळीतही हेच म्हटले होते ना.तूच सर्वस्व आहेस मग काय अभिप्रेत असेल इथे वेगळं.मग थोडा अधिक विचार करावा वाटते..स्तोत्र या शब्दाचा सोपा अर्थ स्तुती.. पण नुसतं स्तुती करून भगवंत प्रसन्न होईल का हो याचा विचार केला तर प्रत्येक ओळी ओळीवर मनन चिंतन करता येते.तर प्रत्येक ओळ ही नुसती पाठांतरासाठी पारायणासाठी नाही तर ती आचरणासाठीही आहे..तिचा अर्थबोध घेत आपले आचरणात कुठे चुकते आहे हे समजून घेणेही आवश्यक आहे..नुसत्या स्तुतीपाठातून भगवान साध्य व्हावा इतका तर तो सोपा ना

घोरकष्टोद्धारण श्लोक पाचवा

 ।। श्री गुरुदेव दत्त ।। ।। घोरकष्टोद्धारण दत्तप्रितीकारकस्तोत्र ।। ~ आज या 'स्तोत्रपञ्चकातील' पाचवा श्लोक  धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं । सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।। भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।।५।। अर्थ - हे अखिलानंदमूर्ते श्री दत्तात्रेया, माझी बुद्धी,प्रीती जिथे धर्म आहे तिथे स्थिर होऊन सत्संगात माझी वृत्ती अखंड दृढ राहूदे. (भुक्ति) अर्थात दारिद्यादि संकटापासून मला नेहमी मुक्त ठेव.  माझी आसक्ती फक्त तुझ्या चरणी स्थिर कर.आणि मला सद्गती दे.तुला माझा मनःपूर्वक नमस्कार असून तू माझी या घोर संकटातून मुक्तता कर.. भावार्थ - उपासनेसाठी लागणारे सूक्ष्म बारकावेच खरतर इथे प्रार्थनेतून मागितले आहेत. शुद्ध बुद्धीचे वरदानच मागितले आहे जेणेकरून अज्ञानातून येणारे अडथळे आपोआप नष्ट होतील. भक्तीचा स्वास्थ्यकारक प्रवास मागितला आहे आणि त्यासाठीच दारिद्यादि विवंचनेपासून मला दूर ठेव अशी प्रार्थना सद्गुरुंजवळ केली आहे. माझे मानसिक  तथा शारीरिक स्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी जितके किमान गरजेचे आहे तितक्या अन्नधान्य वस्त्रादि गरजांची पूर्तता नेहमी होऊदे